Tuesday, July 13, 2010

Friday, July 9, 2010

hirwaie cha run

हिरवळ
शुभाशुभ मुहूर्ते कधी मानलीच नाही..

कळत-नकळत जे काही रूजत गेलं..

त्याचचं फलीत ते...

कुतुहलाने अंकुरत गेलं...

मातीतुनचं जन्माला आला रंग, संवाद, संवेदनांचा एक भला मोठ्ठा पुंजका...

मनाला मेंदुच्या चाकोरीतून बाहेर काढण्याचे श्रेय पण त्यांनाच..

त्यांनीच जानवु दिला नाही कधी 'मी' पणा..

म्हणूनच, पहील्या घंटेपासून-मध्यांतरा पर्यंन्त तरी..

शुन्य होतांनाही शुभाशुभ मुहुर्ते कधी मानलीच नाही...

आणि गोठलेल्या या पांढऱ्या गर्दितही...

निर्मळ-खळखळ वाहण्याचा पारदर्शक जीवनानंद घेता आला...

त्या माझ्या मातीतल्या हिरवळीचे ‌ऋण तिसऱ्या घंटेआधि फेडण्यासाठी...

Friday, July 2, 2010